गहू या पिकाबद्दल माहिती घेण्या अगोदर गहू हे पिक आपण घ्यावे कि नाही? या प्रश्नाचे उत्तर शेतकरी बांधवांनी जाणून घ्यायला हवे. घ्यायचा असेल तर किती क्षेत्र या पिकास द्यावे? व उत्पादनाचे काय लक्ष्य ठेवावे? हे मुद्दे देखील अतिशय महत्वाचे आहेत. कोणकोणती पिके घेतली जावू शकतात? इतर कोणते पिक आपण घेवून आपण चांगला नफा कमवू शकतो का? आपल्याकडे एकूण किती क्षेत्र आहे? मृदेची अवस्था काय? कोणत्या पिकासाठी बाजारपेठ अनुकूल आहे? कोणत्या पिकापासून किती उत्पादन येईल? शाश्वत उत्पन्न किती? पाणी साठा किती? सर्वसाधारण वातावरणाचा कल कसा असणार आहे? मनुष्यबळ किती उपलब्ध आहे? यापूर्वीचा आपला काय अनुभव आहे? गहू पिक घ्यायचे असेल तर कोणते वाण निवडावे? गहू कोणत्या ग्राहकासाठी घ्यायचा? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक शेतकरी बांधवासाठी वेगवेगळी असतील. असा चौफेर विचार करून निर्णय घ्यावा.