Tulas lagwad marathi
तुळस खत व्यवस्थापन

तुळस खत व्यवस्थापन

तुळससामान्यतः तुळशी तीन प्रकारात उपलब्ध आहे:१.राम तुळस२.कृष्ण तुळस
३.वन तुळस
त्यात ओ . बॅसिलिकम आणि ओ सॅन्क्टम ह्या दोन जाती सुगंधी तेल आणि सुकविलेले पाने ग्रीन टी किंवा आयुर्वेदिक उपचारमध्ये वापरतात.तुळस हि महाराष्ट्रात चांगली येते.फक्त ज्या जमिनीत पाणी साचून राहते तिथं तुळशीचे मूळ कुजतात त्यामुळे कोरड्या आणि पाणी झिरपरणाऱ्या जमिनीत तुळस लावावी.तुळस बी लावूनच उगविली जाते. फेब्रुवारी च्या तिसऱ्या आठवड्यात वाफ्यावर किंवा नर्सरी उगवतात आणि पुनर्रलागवड एप्रिल च्या मध्ये केली जाते.तुळशीचे बियाणे सिमॅप इन्स्टिटयूट, जृलखनौ येथे संशोधन केलेले चांगले बियाणे उपलब्ध आहे. जे सुगंधी तेल आणि सुकलेले पाने दोघांसाठीही अतिशय चांगली आहे.९०-१०० ग्राम बियाणे हे एका एकरसाठी लागतात. या बिया अतिशय छोट्या आल्यामुळे ते वाळूमध्ये एकत्र करून २ सेंमी खोलीत वाफ्यावर लावावे. त्यानंतर शेणखत आणि माती एकत्र करून वरून थोड्या प्रमाणात टाकावे . ६ आठवड्यानंतर ४ ते ५ पान आल्यानंतर पुनर्रलागवडीसाठी रोपे तयार होतात.त्यानंतर जमिनीत ६ टन/ एकर याप्रमाणे शेणखत एकत्र करावे. ४० बाय ४० सेंमी या अंतरावर तुळशीच्या रोपाची लागवड करावी. लावल्यानंतर लगेच थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.
३० किलो नञ, २० किलो स्फुरद, आणि २० किलो पलाश हे पर एकर असे द्यावे. कोबाल्ट आणि मॅगनीस १०० पीपीएम य प्रमाणात सूक्ष्म मूलद्रव्ये तेलाचे प्रमाण वाढविन्यासाठी द्यावे .उन्हाळ्यात महिन्याला तीनदा तरी पाणी द्यावे आणि बाकीच्या वेळेस गरज लागल्यास पाणी द्यावे. मल्चिंग चा वापर केल्यास पाण्याचा कमी प्रमाणात वापर होतो आणि उत्पादनही वाढते.तुळशीवर पाने गुंडळणारी अळी, भुरी आढळल्यास १०,००० पीपीएम azadirechtin @५ml /ltr चा स्प्रे करावा.पहिली काढणी हि ९०-९५ दिवसानंतर पुनर्रलागवडीनंतर होते नंतर ६५ ते ७५ दिवसाच्या अंतराने काढणी करावी. जमिनीपासून १५ ते २० सेमी अंतरावर तुळशी कापावी.काढणी केल्यानंतर ४ ते ५ तास सगळी रोप तशीच शेतात राहू द्यावीत पण त्यापेक्षा जास्त वेळ नाही ठेवावीत त्याने तेलाची उप्लब्धह्ता कमी होते. तेलासाठी स्टीम डिस्टिलेशन युनिट चा वापर करून तुम्ही तेल बनवू शकतात. हे युनिट तुम्हाला सिमॅप इन्स्टिटयूट मध्ये मिळते.पर एकर २ टन एवढे उत्पन्न एका वर्षात मिळते. तेलाचे उत्पन्न ८-१७ किलो एका एकरला वर्षभरात मिळते.
मार्केटिंग साठी काही कंपनी करार पद्धतीनेही शेती करतात. तुम्ही सेंद्रिय पद्धतीनेही तुळशी लावू शकतात यात तुम्हाला भाव आणि मालाला चांगली मागणीही मिळते. तुळशीचा ग्रीन टी बनवणाऱ्या कंपनीना मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानाची गरज असते. आणि तुम्ही तेल बनवून तेलही देऊ शकतात. इंडिया मार्ट वेबसाईट वर रेजिस्टर करून तुम्ही तुमच्या मालाचे प्रोमोशन करू शकतात.हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सर्व हिंदू घरा बाहेर तुळस दिसते,विवाहित महिला रोज तिला पाणी घालून तिची पूजा करतात.तुलसी या शब्दाचा अर्थ अतुलनीय असा होतो,तिच्या विविध गुणांमुळे ते प्रत्ययास येते. तुळस रोग प्रतिकारक, कफ नाशक आहे. शिवाय त्वचारोग, मधुमेह, डोळ्यांचे, दातांचे आरोग्य यावरही गुणकारी आहे.पचनक्रिया सुधारते, स्मरणशक्ती वाढते, कोलेस्टोरोल नियंत्रणात ठेवते. तुळशीत अर्सोलिक असिड, ओलीनोलिक असिड, रोस्मारीनिक असिड, लीनोलीनिक असिड, क्लोरोफिल, कार्योफिलीन आदि रसायने असतात.तसेच व्हिटामिन ए,सी, कॅल्शियम, आयर्न, झिंक असते. आयुर्वेदात अनेक औषधामध्ये तुळशीचे घटक असतात.तुळशीची पाने, काढा, रस, बिया अशा अनेक प्रकारात सेवन केले जाते. तुळशीचे घटक असलेले शाम्पू, ग्रीन टी, कॅप्सूल, कफ सिरप आहेत. फालुदा, मस्तानी या लोकप्रिय खाद्य प्रकारात तुळशीच्या बिया वापरतात.सर्व प्रकारच्या तुळशीच्या पानांची,फुलांच्या मंजिऱ्यांची चव कमी जास्त तिखट असते व उष्ण गुण असतो.तुळशीच्या मंजिऱ्यांमधील बिया अतिशय बारीक,गोल व काळ्या रंगाच्या असतात.या बिया पाण्यात घातल्या असता बुळबुळीत होतात.चवीला गोड असून थंड गुणाच्या असतात.तुळशीच्या पानांना,मंजिऱ्यांना तैलांशामुळे सुगंध येतो.या तेलामध्ये सुमारे सत्तर टक्के युजेनाॅल नावाचे औषधी कार्यकारी तत्त्व असते.याशिवाय पानात कॅलशियम,फाॅस्फरस इत्यादी खनिजे असतात.
तुळशीचे उपयोग बाहेरून
शिबे,गजर्क इत्यादी बुरशीजन्य कातडीच्या विकारांवर तुळशीच्या पानांचा रस,लिंबाचा रस कातडीवर वरचेवर चोळावा.कातडीतील रक्तप्रसादन चांगले होऊन व जंतुनाशक होऊन त्वचा निरोगी राहते.म्हणून तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ करावी.हल्ली तुळस पानाचा अर्क असलेले अंघोळीचे साबणही निघालेले आहेत.जुनाट जखम: तुळशीची पाने वाटून जखमेवर लेप लावल्यास जखम स्वच्छ होऊन भरून येते.तुळसीचे बी मधुर, शीतगुणाचे, धातुवर्धक, पित्तशामक व शुक्रवर्धक आहे.त्यामुळे त्याचा उपयोग अशक्तपणा,शुक्रवाढीसाठी व लघवीच्या विकारांमध्ये चांगला होतो.अशक्तपणा व शुक्रवाढीसाठी तुळशीच्या बियांची खीर दूध साखरेबरोबर १ कप प्यावी.लघवीची जळजळ,कष्टाने लघवी होणे इत्यादी तक्रारींवर थंड पाण्यामध्ये तुळशीच्या बियांचे सरबत साखर घालून थोडे थोडे वरचेवर प्यावे.उन्हाळा बाधू नये म्हणून तुळशीच्या बियांचे थंड पाण्यातील गोड सरबत घ्यावे.
तुळशीचे उपयोग
• भूक न लागणे व अपचन:
जेवणाआधी तुळशीची ८ ते १० पाने चावून खावीत.जेवणात भातावर तुळशीची पाने.घालण्याची परंपरा,पद्धत आहे.त्यामागे हेतू आहे.तुळस अन्न पचनास मदत करते व कृमिघ्न आहे.
• हृदयाच्या आरोग्यासाठी:
तुळस पानामुळे विशेषत:हृदयाचे रक्ताभिसरण होते असे लखनऊच्या मेडिकल काॅलेज हाॅस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांवर केलेल्या संशोधनातून आढळून आलेले आहे.त्यामुळे प्रत्येकाने दररोज १० ते १२ तुळशीची पाने चावून खावीत.तुळशीच्या पानांचा रस २ चमचे,एक चमचा मध दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावा.
• सर्दी, खोकला:
विशेषत: पावसाळ्यात, हिवाळ्यात होणारे सर्दी व खोकल्यावर व अॅलर्जीवर होणाऱ्या कोरड्या ढासेच्या खोकल्यावर तुळस फारच उपयुक्त आहे.तुळशीची पाने दिवसातून ३ ते ४ वेळा चावून खावीत.
मानसिक ताणतणाव:
तुळशीमुळे मानसिक ताणतणाव निश्चित कमी होऊन मन शांत होते.असे रशियामधील एका संशोधनाद्वारे दिसून आले आहे.
• तापामध्ये गुणकारी:
पावसाळ्यात, हिवाळ्यात येणाऱ्या तापावर तुळस फारच गुणकारी आहे.२ चमचे तुळसीचा रस,एक चमचा मध दिवसातून ३ ते ४ वेळा घ्यावा.अशा तापाबरोबर असणारे सर्दी,खोकला,डोकेदुखी,अंगदुखी इत्यादी लक्षणेही तुळशीमुळे कमी होतात.
• मलेरियाच्या प्रतिबंधासाठी उपचारासाठी:
सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनऊ या शासकीय संस्थेमध्ये झालेल्या संशोधनावरून तुळशीचा मलेरिया होऊ नये म्हणून व झाल्यावरही चांगला उपयोग होतो.असे दिसून आले आहे.यासाठी तुळशीच्या पानांचा रस २ चमचे,मिरपूड अर्धा चमचा,दोन चमचे मध दिवसातून २ ते ३ वेळा घ्यावा.