वाल उत्पादन

सुधारित वाण
उंच वाढणारे वाण - फुले गौरी, बुटके वाण -कोकण भूषण, फुले सुरुची.

पेरणीची वेळ
खरीप : जून - जुलै
रबी : सप्टेंबर - ऑक्टोबर

बियाण्याचे प्रमाण
उंच वाढणाऱ्या वाणासाठी २.५ ते ३.० कि प्रति हेक्टर, बुटक्या वाणासाठी ६ ते ८ कि. प्रति हे.

लागवडीचे अंतर
उंच वाढणाऱ्या वाणासाठी २.० ४ १.० मी. (ताटी पद्धत) बुटक्या वाणासाठी ६० x ३० सें. मी.

आंतरमशागत
अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करणे.
ब) लागवडीपासून एक महिन्यात ताटी पद्धतीची उभारणी करावी.
क) लागवडीपासून ४० दिवसांत पिकाला मातीची भर लावावी.
ड) उंच वाढणाऱ्या जातीमध्ये वेल ताटीवर जाईपर्यंत वेलीच्या बगलफुटी काढून टाकाव्यात व वेलींना वळण द्यावे.

पाणी व्यवस्थापन
१० - १५ दिवसाच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे.

पीक संरक्षण
कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम याची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
शेंगा पोखरणारी अळी
या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मि.ली. किंवा क्लोरॅनॅट्रनीली १८.५ %  एस.सी. ३ मिली प्रति १० लिटर पाण्यातुन फवारावे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खते :
२० टन शेणखत किंवा ७.५ टन गांडूळ खत प्रति हेक्टर द्यावे.
ब)रासायनिक खते :
१००:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.
क)जिवाणू खते :
अँझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रत्येकी १ किलो बियाण्यास चोळावे.

खते देण्याची वेळ
१. सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावीत.
२. रासायनिक खते - ४०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर लागवडीच्या वेळी द्यावे व उर्वरित २० किलो नत्र लागवडीनंतर दोन महिन्यांनी द्यावे.

उत्पादन
१५ - २० टन प्रति हेक्टर (उंच वाढणारे वाण)
१० - १२ टन प्रति हेक्टर (बुटके वाण).