जमीन
हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी.
हवामान
या पिकास उष्ण हवामान मानवते. १८ ते ३० डिग्री सें. तापमानात बियांची उगवण चांगली होते आणि ३० ते
३५ डिग्री सें. तापमानात पिकाची शारिरीक वाढ चांगली होते.
भरखते
१० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टर .
सुधारित जाती
अर्का टिंडा, टिन्डा एस.-४८३, अर्का अन्नामलाई.
पेरणीची वेळ
उन्हाळी : जानेवारी -फेब्रुवारी, खरीपः जुलै - ऑगस्ट.
लागवडीचे अंतर
दोन ओळीतील अंतर १ मिटर, २ वेलीतील अंतर ०.६० मिटर, ३० मायक्रॉन जाडीच्या काळ्या-चंदेरी
रंगाच्या आच्छादनाच्या कापडाचा उपयोग करावा.
बियाण्याचे प्रमाण
३ ते ४ किलो/ हेक्टर, बियाणे २४ ते ४८ तास ओल्या कापडात बांधून ठेवावे. लागवडीपूर्वी कार्बेन्डेझीम या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावे.
रासायनिक खते
लागवडीपूर्वी २५:५०:५० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर ३० दिवसांनी २५ किलो प्रति
हेक्टर नत्र खताची मात्रा बांगडी पध्दतीने द्यावी. आच्छादनात कागदाचा वापर केला असल्यास ठिबकमधून
खते द्यावीत.
आंतरमशागत
पिकाच्या जोमदार वाढीसाठी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे, लागवडीनंतर ३० दिवसांनी उर्वरीत नत्र
खताची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन
लागवडीच्यावेळी सऱ्या ओलवून घ्याव्यात व नंतर लागवड करावी. खरीप हंगामात पाऊस नसल्यास १५
दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळी हंगाम असल्यास ५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिक
फुलावर व फळधारणेच्या काळात पाण्याचा ताण दिल्यास फुळगळ, फळगळ व फळांच्या वजनात घट येते.
फळांची काढणी
साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. जाती परत्वे ७ दिवसांच्या अंतराने १० ते १२ तोडण्या होतात.
ढेमसे फळावर बारीक लव असते आणि नखाने दाबल्यास त्यावर ठसा उमटतो.
त्यास कोवळे फळ समजावे. ढेमश्याची फळे लुसलुशीत कोवळी असताना काढणी करावी.
पिकाचा कालावधी १४० ते १५० दिवस.
किड व रोगव्यवस्थापन
इतर वेल वर्गीय पिकांप्रमाणेच ढेमसे पिकातही लालभुंगेरे, फळमाशी, भूरी व केवडा इत्यादी किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्रण
क्ल्यु ल्युर कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे. ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
बेनोमिल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. केवडा रोगाची लक्षणे दिसताच झायनेब १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.