मशरूम आंतरपिके

अळिंबीची लागवड
अळिंबी ही बुरशी वर्गातील विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे फळ आहे. निसर्गातविशेषतः पावसाळ्यात ही अशी फळे पहावयास मिळतात. त्यास अळिंबी किंवा भूछत्र असे संबोधतात. इंग्रजीतती “मशरुम" या नावाने ओळखतात. निसर्गात अळिंबीचे विषारी व बिनविषारी तसेच विविध आकार व रंगानुसारअसंख्य प्रकार आहेत. निसर्गात वाढणाऱ्या अळिंबीचा खाण्यासाठी वापर करण्यापुर्वी त्या खाण्यास योग्यआहेत किंवा नाहीत याची अनुभवी व्यक्तीकडून खात्री करुन घ्यावी. जगभरात अळिंबीचे खाण्यास उपयुक्त असे२००० प्रकार असून त्यापैकी भारतात २०० प्रकारांची नोंद केली आहे. वेगवेगळ्या देशात मिळून १०-१२प्रकारांच्या अळिंबीची व्यावसायिक स्तरावर लागवड करण्यात येते. त्यापैकी भारतात बटण, धिंगरी, दुधी वभाताच्या पेंढ्यावरील अळिंबीची लागवड प्रचलित आहे.

१. धिंगरी अळिंबी
या अळिंबीस धिंगरी किंवा शिंपला व इंग्रजीत ऑइस्टर असे म्हणतात. जगामध्येया अळिंबीच्या लागवडीची पध्दत सोपी व कमी कालावधीची असल्याने सर्वसामान्य माणसांना थोड्याशाप्रशिक्षण व कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करता येतो. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूलअसल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे

अळिंबीचे आहारातील स्थान :
आपल्या आहारात अनेक अन्नपदार्थ उपलब्ध असले तरीसुध्दा अळिंबीस आहारातवैशिष्टयपूर्ण स्थान आहे. ताज्या धिंगरी आणि बटण अळिंबीमध्ये असणाऱ्या अन्नघटकांच्या प्रमाणातलक्षणीय तफावत नाही. धिंगरी अळिंबीतील प्रमुख अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. प्रथिने २.७८%,स्निग्ध पदार्थ ०.६५% कर्बोदके ५.२%, खनिजे ०.९७%, तंतुमय पदार्थ १.०८%, पाणी ९०% खनिजांपैकी पालाश,स्फुरद, कॅल्शियम, लोह, सोडियम इत्यादी उत्तम प्रमाणात आहेत. जीवनसत्वापैकी ब-१, ब-२ आणि क यांचेप्रमाणही बऱ्याच भाजीपाल्यापेक्षा जास्त आहे. अळिंबीतील प्रथिनांमध्ये शरीरवाढीसाठी आवश्यक त्यासर्व अमीनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्चप्रतीची व पचनास हलकी असतात.या बरोबर जीवाणू, विषाणू व बुरशी प्रतिकारक असलेली प्रथिने अळिंबीमध्ये असतात. जीवनसत्व ब-२ मुळेशर्करायुक्त पदार्थाचे पचन, रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलांचा बेरीबेरी रोगनिवारण्यास मदत होते. क जीवनसत्वामुळे मुलांना स्कहीं रोग, नायसिन व पेटॅथिनिक आम्लामुळे त्वचेचेरोग निवारण्यास तसेच हातापायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. लोह, तांबे या खनिजांचेदात व हाडे यांच्या वाढीसाठी व चांगल्या दृष्टीसाठी उपयोग होतो. फोलीक आम्लाच्या अतिरिक्तप्रमाणामुळे येणारा अशक्तपणा कमी होतो. अळिंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प असल्याने उच्चरक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी व आरोग्यवर्धक ठरते. अळिंबीमध्ये असलेल्या विविध औषधी गुणर्धामुळेप्रामुख्याने लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, इन्फ्ल्यु एंझा, पोलिओ, एडस्, दमा,फुफ्फुसांचे रोग, वंधत्व, विषाणूजन्य तसेच जिवाणूजन्य रोग प्रतिबंधास अगर उपचारास विशेष उपयोग होतोम्हणून अळिंबीस "हेल्थफुड"असे संबोधले जाते

धिंगरी अळिंबीचे प्रकार :
रंग, रुप आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार धिंगरीचे विविध प्रकारआहेत. हे सर्व प्रकार "प्ल्युरोटस्” कुळातील आहेत. या कुळात प्ल्युरोटस् साजर काजू (करड्या रंगाची)जात २० ते ३० सें तापमान व ७० ते ९० टक्के आर्द्रता असताना चांगली वाढते. प्ल्युरोटस् प्लोरिडा(मोठ्या आकाराची व शुभ्र रंगाची) हीस २० ते ३० सें. तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रता अनुकूल असते.ही जात नाजूक असल्याने काळजीपुर्वक हाताळावी लागते. प्ल्युरोटस् एवोस (गुलाबी रंगाची) २१ ते ३५ सें.तापमान व ६५ ते ९० टक्के आर्द्रता अशा हवामानात चांगली वाढते.

लागवडीसाठी आवश्यक बाबी
जागेची निवड :
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण होईल अशानिवाऱ्याची गरज असते. मातीच्या विटांची खोली, पक्के बांधकाम असलेली खोली, बांबूच्या तट्टयापासूनतयार केलेली झोपडी किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन असलेली झोपडी किंवा पोल्ट्रीचे शेड वापरता येते.जागा खेळती हवा व प्रकाश असणारी असावी
अनुकूल वातावरण :
या अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० सें. व हवेतील आर्द्रता ८५ ते ९० टक्के असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणचे तापमान व आर्द्रता यांचेनियंत्रण ठेवणेसाठी जमिनीवर, हवेत तसेच चोहोबाजूने गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रेपंपाने पाणीफवारावे लागते. सर्वसाधारणपणे २५ सें. तापमानास या अळिंबीची उत्तम वाढ होते.
लागवडीसाठी माध्यम :
धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांच्या मळणीनंतर निरुपयोगी अशावाळलेल्या काडावर व पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुख्यतः भात, सोयाबीन व गव्हाचे काड, ज्वारी,बाजरी, मका याची ताटे व पाने. कपाशी व तूर यांच्या काड्या, उसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने,मक्याची कणसे, भूईमुगाच्या शेंगाची टरफले इत्यादींचा वापर करावा.


लागवडीची पूर्वतयारी
माध्यम :
लागवडीसाठी लागणारे काड व पालापाचोळा हे माध्यम चालू हंगामातील न भिजलेलेअसावे. माध्यम १ ते २ वर्षापूर्वीचे तसेच भिजलेले असल्यास त्यावर निसर्गातील सूक्ष्म जीवाणूंची वाढझाल्याने अशा माध्यमावर अळिंबीच्या बुरशीला अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे उत्पादन कमीमिळते. काडाचे २-३ से.मी. लांबीचे तुकडे करुन ठेवावेत.
प्लॅस्टीक पिशव्या :
धिंगरी अळिंबीची लागवड प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या वापरल्या जातात. परंतु लहान प्रमाणात लागवडीसाठी १०० गेज जाडीच्या ३५ x ५५ सें. मी. आकाराच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करावा.
मांडणी :
अळिंबीचे बेडस् (ढेप) ठेवण्यासाठी लोखंडी अथवा बांबूचे मांडणी (रॅक्स) करून घ्यावी किंवा बेडस् टांगून ठेवण्यासाठी छताला समांतर तारा किंवा बांबू बांधून त्यास शिंके बांधून बेड ठेवता येतात.
बियाणे (स्पॉन) :
अळिंबीचे शुध्द बियाणे लागवडीपूर्वी १-२ दिवस आणून त्याचा वापर करावा. याशिवाय फॉर्मे लीन (जंतुनाशक), कार्बेन्डॅझिम/बाविस्टीन (बुरशीनाशक) नुवान किंवा मॅलेथिऑन (किटकनाशक) पाणी व औषधे फवारण्यास स्प्रे पंप, काडाचे तुकडे करण्यास कोयता किंवा कडबा कुट्टी मशीन व काड निर्जंतुकीकरण करण्याची सामुग्री आणून ठेवावी. पावसाळ्यात अळिंबी वाळवण्यासाठी वाळवणी यंत्राचा वापर आवश्यक आहे.

लागवडीची पध्दत
• काडाचे २-३ सें.मी. लांबीचे बारीक तुकडे सछिद्र गोणपाटाचा/ज्युटच्या पोत्यामध्ये भरुन थंड पाण्यात ८-१० तास बुडवून भिजत घालावे.
• काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
काडाचे निर्जतुकीकरण करणे
• भिजविलेल्या काडाचे पोते ८० सें. तापमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवून ठेवावे. काडाचे पोते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी निथळण्यासाठी व थंड करण्यासाठी सावलीत ठेवावे.
• अथवा निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टिन (बुरशीनाशक) व ५० मि.ली. फॉर्मेलीन (जंतूनाशक) १०० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये काडाचे पोते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील पोते बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करावा.

बेड भरणे
काड ३५ ते ५५ सें.मी. आकाराच्या ५ टक्के फॉर्मेलीनमध्ये निर्जंतुककेलेल्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये थर पध्दतीने भरावे. हे काम ५ टक्के फॉर्मेलीनचे द्रावण फवारुननिर्जंतुक केलेल्या बंदिस्त खोलीमध्ये भरावे. काड भरताना प्रथम ५-६ सें.मी. जाडीचा काडाचा थर द्यावाव त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के असावे.काड व स्पॉन याचे ४-५ थर भरावे. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्यानेपिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या सर्वबाजूने सुई किंवा टाचणीने ४० ते ५० छिद्रे पाडावीत.भरलेल्या पिशव्या निवाऱ्याच्या जागेत मांडणीवर आळिंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी ठेवाव्यात. त्यासाठी२५-२८ से. तापमान अनुकूल असते. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टीकचीपिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास १० ते १५ दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यानी काड घट्ट चिकटूनत्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो. यासच “बेड" असे म्हणतात.

पिकाची निगा :
धिंगरीचे प्लॅस्टीक पिशवी काढलेली बेड मांडणीवर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर हवामानानुसार दिवसातून दोन-तीन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारुन पिकाच्या खोलीतील तापमान (२५-३० सें) व हवेतील आर्द्रता (८५-९० %) नियंत्रित ठेवावी. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी खेळती हवा व प्रकाश यांची गरज आहे. ३-४ दिवसात बेडच्या सभोवताली अंकूर (पीनहेड) दिसू लागतात व पुढील ३-४ दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन ती काढण्यासाठी तयार होते.

काढणी :
पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २०-२५ दिवसात मिळते. काढणीपूर्वी १ दिवस अळिंबीवर पाणी फवारु नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार रहाते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी. लहानमोठी सर्व अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. काढणी अळिंबीच्या देठाला धरुन पिरंगळून करावी. दुसरे पीक घेण्यापुर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर काढून टाकावा. नियमितपणे दिवसातून २-३ वेळा पाणी फवारावे. ९-१० दिवसांनी दुसरे पीक मिळते व त्यानंतर ८-१० दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारपणे १ किलो वाळवलेल्या काडाच्या एका बेडपासून ८०० ग्रॅम ते १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते. किडीचा बंदोबस्त करण्यासाठी काढणीनंतर प्रत्येकवेळी मॅलेथिऑन किंवा नुवान ०.०२ टक्के (१० ली. पाण्यात २ मि. ली.) या प्रमाणात फवारणी करावी. बेडवर फळे असताना किटकनाशके फवारु नयेत.

अळिंबीची साठवणूक:
ताजी अळिंबी छिंद्रे पाडलेल्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये एक दिवस राहू शकते. फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास अळिंबी उन्हामध्ये वाळवावी, अळिंबी उन्हामध्ये दोन-तीन दिवसात पूर्णपणे वाळते. वाळलेली अळिंबी प्लॅस्टीक पिशवीत सील करुन (हवाबंद) ठेवल्यास ती सहा महिन्यापेक्षा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते. वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या वजनाच्या १/१० इतके कमी होते.


धिंगरीचे खाद्यपदार्थ:
अळिंबीचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करता येतात. उदा. भजी, समोसे, सॅलड, क्रीम, अळिंबी, सुकी किंवा रस्साभाजी, अळिंबी-टोमॅटो, अळिंबी भेंडी, भरलेली मिरची, ऑम्लेट, पुलाव, पिझा, सूप, लोणची इत्यादी. त्याचप्रमाणे इतर खाद्यपदार्थात मिसळून चवदार व पौष्टीक पदार्थ बनवता येतात. वाळविलेली धिंगरी कोमट पाण्यात १०-१५ मिनिटे भिजविल्यानंतर खाण्यासाठी तर ताज्या धिंगरीची पावडर करुन ती स्वादिष्ट “सूप” करण्यासाठी वापरता येते. बाजारपेठ : ताज्या व वाळलेल्या धिंगरी अळिंबीची नियमित खरेदी करणारे दलाल किंवा यंत्रणा नसल्याने वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून विक्री व्यवस्था करावी लागते. त्यासाठी हॉटेल्स् , बेकरी, डेअरी, डिपार्टमेंटल स्टोअर्स, पीझा सेंटर्स, केटरिंग व्यवसायीक, अन्नप्रक्रिया करणारे उद्योग यांच्याशी संपर्क साधावा. सूपसाठी पावडर किंवा लोणच्याच्या स्वरुपात प्रक्रिया करून विक्री करता येते. ताजी व वाळवलेली धिंगरी अनुक्रमे रु. १०० ते १२० व रु.८०० ते १००० प्रति किलो भावाने विकली जाते.


२. बटण अळिंबीची लागवड (ॲगॅरिकस बायस्पोरस)
या अळिंबीच्या लागवडीसाठी यांत्रिक साधनांचा वापर करुन तापमान नियंत्रीतठेवावे लागत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. रॅक्स, कंपोस्ट यार्डइ. सुविधासह किमान प्रति दिन ५० कि. ग्रॅ. अळिंबी उत्पादनक्षमता असलेला प्रकल्प किफायतशीर असतो. याअळिंबीच्या उत्पादनासाठी वापरावयाचे कंपोस्ट दिर्घ व कमी मुदतीच्या अशा दोन पध्दतीने करता येते.महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कमी मुदतीच्या पध्दतीनेच कंपोस्ट तयार करतात. यामध्ये गव्हाचे काड,भाताचा पेंढा, ऊसाचे पाचट, सोयाबीनचे काड इ. प्रकारचे पायाभूत पदार्थ वापरतात. त्यामध्ये घोड्याचीलिद कोंबडीचे खत, युरिया, गव्हाचा कोंडा, जिप्सम, यासारखी सेंद्रिय व रासायनिक खते मिसळून त्यापासूनढीग पध्दतीने कंपोस्ट केले जाते. कंपोस्ट दोन टप्प्यात केले जाते. पहिल्या टप्प्यात हवेशीरनिवाऱ्यामध्ये एक दिवसाआड ढिगाची उलथापालथ केली जाते. दहा बारा दिवसानंतर बंदिस्त जागेत कंपोस्टचेतापमान वाफेच्या सहाय्याने ५५ ते ६० से. दरम्यान नियंत्रीत करण्यात येते. त्यानंतर कंपोस्टचे तापमान३०° सें. पेक्षा कमी तापमानापर्यंत खाली आणतात. यावेळी कंपोस्टमध्ये अमोनियाची वाफ नसावी. हेकंपोस्ट प्लॅस्टिक पिशव्यात प्रत्येकी १० कि. ग्रॅ. भरावे कंपोस्टसह पिशवी (बेड) ची उंची २५-३० सें.मी. असावी. कंपोस्ट भरताना त्यामध्ये त्याच्या वजनाच्या ०.७५ टक्के स्पॉन पेरावे.

केसींग
पेरणीनंतर बेडची २५ सें. तापमानास १५ दिवस उबवणी केली जाते. या काळात कंपोस्टवर अळिंबीच्या बुरशीचादाट थर तयार होतो. या वेळी बेडमधील कंपोस्टच्या पृष्ठभागावर चांगले कुजलेले शेणखत व माती किंवा कोकोपीट यांचा समप्रमणात मिश्रणाचा म्हणजेच केसींगचा २ ते ३ सें.मी. जाडीचा थर देण्यात येतो. केसींगथरावर दररोज पाण्याची हलकी फवारणी करून ओलसर ठेवावा, आठ दिवसानंतर खोलीचे तापमान १६ ते १८° से.दरम्यान नियंत्रीत केले जाते. आर्द्रता ८० ते ९० टक्के व पुरेशी शुध्द हवा, पुरविल्यास केसींगकेल्यापासून १२ ते १५ दिवसांत लहान बटण दिसू लागतात. पुढील आठ दिवसात ते पूर्ण वाढतात. स्पॉनपेरणीपासुन ४० ते ५० दिवसांपर्यंत दर आठवड्यास एक या प्रमाणे ५-६ वेळा बहार येतो. देठाचा मुळाकडीलमातीचा भाग कापून स्वच्छ अळिंबी प्रत्येक पाकिटात २०० ग्रॅम भरुन विक्रीस पाठवितात किंवा प्रक्रियाकरुन डब्यात हवावंबद करुन विकली जाते. एक क्विंटल कंपोस्टपासून १५ ते २० किलो ताजी अळिंबी मिळते.बटण अळिंबीचे पी-१, एन.सी.एस. १२, एन.बी.एस. - ५ हे अधिक उत्पन्न देणारे वाण प्रसारित केले आहेत.

स्पॉन (बियाणे) पुरवठा
स्पॉनचा पुरवठा अळिंबी प्रकल्प, कृषि महाविद्यालय, पुणे येथून २५० व ५०० ग्रॅमच्या पॉलीप्रापलीनच्या पिशव्यामधून केला जातो. स्पॉन जास्त हवे असल्यास १०-१५ दिवस अगोदर ५० टक्के रक्कम भरुन मागणी नोंदवावी.

प्रशिक्षण
धिंगरी लागवडीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण व मार्गदर्शन, कृषिमहाविद्यालय, पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत दिलेजाते. त्यासाठी प्रति व्यक्तिस रु. १०००/- शुल्क आकारले जाते. संपर्कः कवकशास्त्रज्ञ, अळिंबीप्रकल्प,कृषि महाविद्यालय, पुणे - ४११००५, फोन नं. ०२०-२५५३७०३३/३८, विस्तारित क्र. २२०.