घेवडा/राजमा
जमीन
हलकी ते मध्यम निचऱ्याची
भरखते
१० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टरी
सुधारित जाती
कन्टेडर, फुले सुयश, फुले सुरेखा.
पेरणीची वेळ
खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी -फेब्रुवारी.
लागवडीचे अंतर
सपाट वाफे -६० x ३० सें.मी., सरी वरंबा- ४५ x ३० सें.मी.
बियाण्याचे प्रमाण
४० किलो/ हेक्टरी
बीजप्रक्रिया
रायझोबियम १० ते १५ किलो बियाणास २५० ग्रॅम या प्रमाणात बियास चोळावे.
रासायनिक खते
लागवडीपूर्वी -२५:११०:११० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी,
लागवडीनंतर - एक महिन्याने २५
किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी व भर लावावी.
पीक कालावधी
९० ते ११० दिवस
खोडमाशी संरक्षण :पिकाची उगवण झाल्याबरोबर लगेच क्विनॉलफॉस २५ % ईसी २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातुन
फवारावे.
उत्पादन
हिरव्या शेगांचे उत्पादन - ९ ते १० टन/हेक्टर.
बियांचे उत्पादन - १ ते १.५ टन प्रति हेक्टरी.