मटकी प्रक्रिया उद्योग

हलकी ते मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ , चोपण, क्षारयुक्त
जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
हेक्टरी ५ टन शेणखत/कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्या नंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

हेक्टरी बियाणे प्रमाण
१२ ते १५ किलो.

पेरणीचे अंतर
दोन ओळीत ३० सें. मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया
१ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेडेझीम चोळावे यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धन
१० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. १२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रती
हेक्टर प्रमाणे पेरणी करतांना खत द्यावे.
पीक २०-२५ दिवसांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसाचे असतांना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.