जमीन
मध्यम प्रतीची, निचऱ्याची.
भरखते
२० टन प्रति हेक्टर शेणखत.
सुधारित वाण
गणेश ब्रोकोली.
बियाणे
४००-५०० ग्रॅम प्रति हेक्टर.
बीज प्रक्रिया
पेरणीपूर्वी बी गरम पाण्यात (५० से.ग्रे.) अर्धा तास बुडवावे. नंतर बी सावलीमध्ये सुकवावे. तसेच बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन हे बुरशीनाशक लावावे.
पेरणीची वेळ
रब्बी : सप्टेंबर -ऑक्टोबर.
पुर्नलागवडीची वेळ
ऑक्टोबर-नोव्हेंबर
शेताची आखणी
६० x ४५ सें.मी.
रासायनिक खते
किलो हेक्टरी नत्र स्फुरद पालाश
अ. लागवडीपूर्वी ६५ २० ३०
ब. लागवडीनंतर ६५ ०० ००
विशेष माहिती
वरील खतांच्या मात्रेसोबत लागवडीच्या वेळी रोपांची मुळे अँझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति लिटर च्या द्रावणात बुडवून लावावीत. ब्रोकोली लागवडीनंतर मोठे गड्डे मिळण्यासाठी खोडावर पानांच्या बगलेत येणारी फुट १ ते २ वेळा अलगद काढावी. ब्रोकोली काढणी करताना गड्डा काळजीपूर्वक काढावा. पक्वता झाल्यानंतर गड्डा घट्ट आणि हिरवागार दिसतो. गड्ड्यावर मोहरीच्या दाण्याप्रमाणे गोलाकार फुलांचा कळीचा भाग दिसू लागतो. काढणी करताना गड्डा १० ते १२ सें.मी. खोड ठेऊन काढावा. गड्डा काढतेवेळी सरासरी वजन १८०-२०० ग्रॅम भरते. ब्रोकोलीची काढणी ५० ते ६० दिवसात सुरू होते तर ६५ ते ७० दिवसात बहुतांश पीक काढले जाते.
पिकाचा कालावधी
६५ ते ७० दिवस.
उत्पादन
६५ ते ७० क्विंटल/हेक्टरी.