कोबी लागवड विषयी माहिती D
कोबी काढणी व मळणी

कोबी काढणी व मळणी

सुधारित वाण
गोल्डन एकर, इतर संकरीत वाण.

पेरणीची वेळ
रबी - सप्टेंबर-ऑक्टोबर.

पुनर्लागवडीची वेळ
रबी - ऑक्टोबर- नोव्हेंबर.

बियाण्याचे प्रमाण
६०० ते ७५० ग्रॅम/ हेक्टर.

लागवडीचे अंतर
४५ x ३० सें.मी.

खतांची मात्रा
२० टन शेणखत, १६०:८०:८० किलो नत्र:स्फुरदःपालाश प्रति हेक्टरी. ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उर्वरित ५० टक्के नत्र लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी दोन समान हप्त्यात विभागून द्यावे.

आंतरमशागत
१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन
८ ते १० दिवसाच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी देणे.

पिकाचा कालावधी
जातीपरत्वे ६५-८० दिवस.

पीक संरक्षण, मावा
डायमेथोएट ३० ई.सी. २० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चौकोनी ठिपक्याचा पतंग  व्यवस्थापन आराखडा
१. लागवडीपूर्वी मुख्य पिकाच्या कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळी नंतर २ ओळी मोहरी पेरावी.
२.शेतात पक्षी बसणेसाठी काठीचे मचान लावावेत.
३. एकरी ५ फेरोमन कामगंध सापळे लावावेत.
४. कोबी पिकावर १ली फवारणी २ अळया प्रति रोप दिसू लागताच बी.टी. १० ग्रॅम, प्रति १० लिटर पाण्यातून (संध्याकाळचे वेळी), ट्रायकोग्रामा बॅक्ट्री कीटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात सोडावे.
५.२ री फवारणी निंबोळी अर्क ५ %
६.३ री फवारणी इंडोक्झाकार्ब १४.५% एस.सी. ५ मिली किंवा स्पिनोसॅड २.५% एस.सी. १२ मिली प्रति १० लिटर पाण्यातून
७. ४ थी फवारणी निंबोळी अर्क ५ %
घाण्या रोग (ब्लॅक रॉट)
स्ट्रिप्टोमायसीन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसाच्या अंतराने २-३ वेळा फवारण्या कराव्या.
पानावरील टिपके
मॅनकोझेप २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन
२५-३० टन/हे.