चवळीची लागवड कशी करतात G
चवळी काढणी व मळणी

चवळी काढणी व मळणी

मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
हेक्टरी ५ टन शेणखत/कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी योग्य पाउस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी.

हेक्टरी बियाणे प्रमाण
चवळी १५ ते २० किलो.

पेरणीचे अंतर
दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया
२५० ग्रॅम रायझोबियम जीवाणुसंवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

२५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी, म्हणजेच १२५ किलो डीएपी प्रती
हेक्टर प्रमाणे पेरणी करतांना खत द्यावे.
पीक २०-२५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.