बटाटा कीटनाशके
|
जमीन
मध्यम काळी, पोयटयाची, निचऱ्याची.
भरखते
२० टन शेणखत प्रति हेक्टर.
सुधारित जाती
कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सुर्या, कुफरी पुखराज
महाराष्ट्रातील मैदानी विभागाकरीता रब्बी बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता कुफरी सुर्या या वाणाची शिफारस करण्यात आली आहे.
पेरणीची वेळ
खरीप - जुन-जुलै, रबी - ऑक्टोबर-नोव्हेंबर.
लागवडीचे अंतर
सऱ्या-वरंबे, ६० ४ २० सें.मी.
बियाण्याचे प्रमाण
१५ ते २० क्विंटल/हेक्टरी
बीजप्रक्रिया
२.५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रवरुप अझिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात २० क्विंटल
बियाणे ३० मिनिटे बीजप्रक्रिया करावी.
रासायनिक खते
लागवडीपूर्वी १००:६०:१२० किलो नत्रःस्फुरदः पालाश प्रति हेक्टरी लागवडीनंतर एक महिन्याने
५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी व भर लावावी.
९० ते १०० दिवस
पीक संरक्षण
मावा व फुलकिडे:
मावा किडीसाठी थायमिथोक्झाम २५ % डब्ल्यु.जी. २ ग्रॅम व फुलकिडे नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० % इ.सी. १५ मिली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
पाने खाणारी स्पोडोप्टेरा अळी:
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव. अळ्या पिकांची पाने तसेच जमिनीतील बटाटे खाऊन फस्त स्पोडोप्टेरा अळी करतात.
नियंत्रण
अ) रात्रभर गवताचे ढिग पिकात ठेऊन सकाळी अळ्यांसह नष्ट करावेत.
ब) पक्षांसाठी ४ ते ५ पक्षी थांबे प्रति एकरी शेतात लावावेत.
क) अंडीपुंज अथवा अळीपुंज निदर्शनास आल्यास नष्ट करावेत.
करपा
लवकर येणारा आणि उशिरा येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३० ग्रॅम किंवा क्लोरोथैलोनील
२५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून रोगाची लक्षणे दिसताच फवारणी करावी.
उशिरा येणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या बुरशीनाशकाची रोगाचे
लक्षणे दिसताच फवारणी करावी.
२०-३० टन प्रति हेक्टरी