ghevda lagwad mahiti
घेवडा खत व्यवस्थापन

घेवडा खत व्यवस्थापन

जमीन
हलकी ते मध्यम निचऱ्याची.

भरखते
१० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
कन्टेडर, फुले सुयश, फुले सुरेखा.

पेरणीची वेळ
खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी -फेब्रुवारी.

लागवडीचे अंतर
सपाट वाफे -६० x ३० सें.मी., सरी वरंबा- ४५ x ३० सें.मी.

बियाण्याचे प्रमाण
४० किलो/ हेक्टरी.

बीजप्रक्रिया
रायझोबियम १० ते १५ किलो बियाणास २५० ग्रॅम या प्रमाणात बियास चोळावे.

रासायनिक खते
लागवडीपूर्वी -२५:११०:११० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी,
लागवडीनंतर - एक महिन्याने २५
किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी व भर लावावी.

पीक कालावधी
९० ते ११० दिवस.

खोडमाशी संरक्षण
पिकाची उगवण झाल्याबरोबर लगेच क्विनॉलफॉस २५ % ईसी २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातुन
फवारावे.
हिरव्या शेगांचे उत्पादन - ९ ते १० टन/हेक्टर.
बियांचे उत्पादन - १ ते १.५ टन प्रति हेक्टरी.