मिरची पेरणीचे अंतर व खोली
|
फुले ज्योती.
लागवडीची वेळ
खरीप : जून - जुलै.
बियाण्याचे प्रमाण
१.० ते १.२५ किलो प्रती हेक्टरी. रोपवाटीकेत रोपे तयार करावीत (४० ते ४५ दिवस).
लागवडीचे अंतर
खरीप : ६० x ४५ सेमी. खतांची मात्रा : १००:५०:५० नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टर.
आंतरमशागत
१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी वरखताच्या मात्रा द्याव्यात.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खते : २० ते २५ टन शेणखत/हेक्टर
ब) जीवाणु खते : स्फुरद विरघळणारे जीवाणू२५ ग्रॅम/किलो बियाण्यास चोळावे.
१) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
२) रासायनिक खते १००:५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश/हेक्टर, अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ५० किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
३) जीवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
४) बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
आंतरमशागत
१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी. म्हणजे झाडे कोलमडनार नाहीत.
कीड व रोग फुलकिडे
फुलकिडे हे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुरडा-मुरडा असे म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस.एल.५ मिली किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. १५ मिली. या किटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करतांना पावसाळी वातावरणामध्ये चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा.
कोळी
मिरची पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रीन ३० % ईसी ५ मिली. किंवा फेनॅक्झाक्वीन १० ई.सी. २५ मिली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
फळकूज, फांद्या वाळणे आणि पानावरील ठिपके
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळांवर आणि पानावर वर्तुळाकार गोल डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतु वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे . कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्याचा नाश करावा तसेच मन्कोझेब २५ ग्रॅम किंवा अॅझोक्झीस्ट्रोबीन १० मिली किंवा हेक्झाकोनेझोल १५ मिली किंवा टेब्यु कोनेझोल १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या आलटून-पालटुन कराव्यात.
भुरी रोग
भुरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजुस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनेझोल १० मिली किंवा कॅप्टन + हेक्झाकोनेझोल १० मिली १० लिटर पाण्यात मिसळुन २-३ फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.