दुधी भोपळा पेरणीचे अंतर व खोली
|
जमीन
मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी.
भरखते
१५ ते २० टन शेणखत प्रति हेक्टरी.
सुधारित जाती
सम्राट
पेरणीची वेळ
खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी-फेब्रुवारी .
लागवडीचे अंतर
३.०४ १.० मीटर (मंडप पध्दत) ५.०४ १.० मीटर (जमिनीवर) .
बियाण्याचे प्रमाण
२ ते २.५ किलो/ हेक्टरी .
रासायनिक खते
लागवडीपूर्वी-५०:५०:५० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी,
लागवडीनंतर- ३० व ४५ दिवसांनी दोन समान हप्त्यात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.
पिकाचा कालावधीः १८० ते २०० दिवस .
फुलकिडे,मावा व पांढरी माशी
पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात.
तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
काळा करपा
थायोफेनेटमिथील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
नागअळी
अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात.
फळमाशी
अळया फळात राहुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात.
नियंत्रण
क्ल्यु ल्युरचे कामगंध सापळे एकरी ५ याप्रमाणात वापरावे. ५ % निबोळी अर्काची फवारणी करावी.
उत्पादन
४० ते ५० टन प्रति हेक्टरी.