जमीन
मध्यम प्रतीची, भुसभुशीत, निचऱ्याची जमीन उपयुक्त.
भरखते व वरखते
१० टन/हे. व ८०:४०:८० कि/हे नत्र : स्फुरद : पालाश (नत्र व पालाश तीन समान हप्त्यामध्ये,
लागवडीचे वेळी व त्यानंतर दीड महिन्याचे अंतराने व स्फुरद लागवडीचे वेळी द्यावे).
सुधारित वाण
कोकण हरितपर्णी किंवा स्थानिक वाण.
बियाणे
१२००० ते १३००० कंद / हेक्टरी, रोगविरहीत कंद निवडावे.
लागवडीची वेळ
जून किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर.
लागवडीचे अंतर
सरी वरंबे पद्धत ९० x ३० सें.मी.
आंतरमशागत
२० ते ३० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. गरजेनुसार पाणी देणे.
काढणी
पानांचा उपयोग करावयाचा असल्यास दोन ते अडीच महिन्यानंतर तोडणी करावी अशी तोडणी ८ ते ९
महिने करता येते. कंदाचा उपयोग करावयाचा असल्यास ६ महिन्यामध्ये कंद तयार होतो.