गवार
जमीन
हलकी ते मध्यम तसेच, रेताड, निचऱ्याची.
 भरखते
 २० ते ३० टन शेणखत प्रति हेक्टरी.
 सुधारित जाती
  पुसा सदाबहार, पुसा मोसमी, पुसा नवबहार, फुले गवार.
 पेरणीची वेळ
 खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी -फेब्रुवारी.
 लागवडीचे अंतर
 सपाट वाफे - ३० x १५ सें.मी., सरी वरंबा -४५ x १५ सें.मी.
 बियाण्याचे प्रमाण
 १४ ते २४ किलो/ हेक्टरी.
 बीजप्रक्रिया
 चवळी गटातील रायझोबियम १० ते १५ किलो बियाणास २५० ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
 लागवडीपूर्वी- २०:६०:६० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर एक
  महिन्याने २०.
 किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी व भर लावावी.
 पिकाचा कालावधी
 ९० ते ११० दिवस.
उत्पादन
५ ते ६ टन प्रति हेक्टरी.