मोसंबी प्रश्नउत्तरे

जमीन
मध्यम काळी कसदार, भुसभुशीत, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, चुनखडी विरहित, सामू
६.५-८.० असलेली, क्षारांचे प्रमाण ०.५० डे सी सा/मी. पेक्षा कमी तर उपलब्ध चुन्याचे प्रमाण १०% पेक्षा
जास्त नसावे.

खुंटाचा वापर
रंगपूर लाईम अथवा रंगपूर लाईम राहुरी.

वाण
मोसंबी, फुले मोसंबी.

लागवडीचे
६x६ मीटर, खड्ड्याचे आकारमान १x १ x१ मीटर,
लागवडीचे वेळी कलमाचा जोड जमिनीपासून.

अंतर
२०-२५ सें.मी. उंचीवर असावा.

खतांचे व्यवस्थापन
पाचव्या वर्षानंतर आंबे बहार अथवा मृगबहार घ्यावा. आंबे बहारासाठी नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात तर
मृग बहारासाठी एप्रिल- मे महिन्यात बागेचे पाणी थांबवावे व ताण द्यावा. बहार घेताना वरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद
विरघळविणारे जिवाणू + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम + १०० ग्रॅम अॅझोस्पिरिलम द्यावे. ताण सोडतांना सेंद्रिय खते एका बांगडीत टाकून तर रासायनिक
खते दुसऱ्या बांगडीतून द्यावे. तसेच मध्यम खोल काळ्या जमिनीत लागवड केलेल्या मोसंबीच्या आंबे बहारातील दर्जेदार फळांच्या अधिक उत्पादनासाठी

अन्नद्रव्याची
मात्रा पुढीलप्रमाणे विभागून द्यावी. जानेवारी - ४० टक्के नत्र ( ३२० ग्रॅम नत्र) + ५० टक्के स्फुरद (१५० ग्रॅम स्फुरद) मार्च - ४० टक्के नत्र
(३२० ग्रॅम नत्र) + ५० टक्के स्फुरद ( १५० ग्रॅम स्फुरद) मे. - २० टक्के नत्र (१६० ग्रॅम नत्र) +५० टक्के पालाश (३०० ग्रॅम पालाश) जुलै- २५
टक्के पालाश ( १५० ग्रॅम पालाश)व सप्टेंबर - २५ टक्के पालाश (१५० ग्रॅम पालाश). खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची असल्यास शिफारसीत मात्रेच्या ७५ टक्के .

नत्र
आणि पालाश म्हणजेच ६०० ग्रॅम नत्र आणि ४५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्षी ठिबक सिंचनाद्वारे आणि २० किलो शेणखत +१५ किलो निंबोळी पेंड + ३०० ग्रॅम .

स्फुरद
प्रति झाड प्रति वर्षी जमिनीतून द्यावे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम काळ्या जमिनीत लागवड केलेल्या मोसंबीचे आंबिया बहाराचे सेंद्रिय पद्धतीने दर्जेदार फळांचे अधिक उत्पादनासाठी
२० किलो गांडूळखत + ८ किलो निंबोळी पेंड प्रती झाड प्रती वर्षी जमिनीतून द्यावे.
मार्च व जुलै महिन्यात नवीन पालवी आल्यानंतर ०.५% झिंक सल्फेट, मँगेनीज सल्फेट व मॅगनेशियम सल्फेट आणि
०.३% फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी. ताण सोडतांना आंबवणी- चिंबवणी पद्धतीने ३-४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी दुहेरी आळे (बांगडी) पद्धतीने द्यावे.

आंतरपीके
सुरवातीच्या ४-५ वर्षापर्यंत दोन ओळीमध्ये भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन,
गवार, चवळी, पालेभाज्या, पानकोबी, फुलकोबी, कांदा, गहू व हरभरा आंतरपिक म्हणून घ्यावे.

पाणी व्यवस्थापन
मध्यम काळ्या जमिनीत लागवड केलेल्या मोसंबीच्या आंबे बहारातील (जानेवारी) झाडांच्या जोमदार
वाढीसाठी व दर्जेदार फळांचे अधिक उत्पादनासाठी तसेच पाण्याच्या व खताच्या बचतीसाठी दररोज बाष्पोपीत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व शिफारशीत खत यात्रेच्या
८० टक्के नत्र व पालाश खते (६४० ग्रॅम नत्र आणि ४८० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष) आठ समान हप्त्यात ठिबक सिंचनाद्वारे तसेच २० किलो शेणखत
+ १५ किलो निंबोळी पेंड + ३०० ग्रॅम स्फुरद प्रतिझाड प्रति वर्ष जमिनीतून यावे. मोसंबीच्या दर्जेदार फळांच्या अधिक उत्पादनासाठी आणि फायद्यासाठी ८०%
पाण्याचे पुर्नभरण टप्पा-१ ते टप्पा-५ (जानेवारी -ऑक्टोबर) मध्ये करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

तण व्यवस्थापन
ग्लायफोसेट १००-१२० मि.लि. + १००-१२० ग्रॅम युरिया प्रती १० लिटर पाण्यात मिसळून तणांचा
प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पूर्नउगवण ३०% आढळून
आल्यानंतर कराव्यात.

पीक संरक्षण
१) पाने खाणारी अळी : क्विनॉलफॉस २५ % ई.सी. २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) मावा
: डायमिथोएट २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 ३) कोळी
 : पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डायकोफॉल १८.५% ई.सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
४) सिल्ला
: इमिडोक्लोप्रीड १७.८% एस.एल. ४ मि.ली. अथवा थायोमिथोक्झाम २५% डब्ल्यू जी १ ग्रॅम १०
लिटर पाण्यातून फवारणी करावी.
५) पानावरील ठिपके : पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून टाकाव्या.
६) ट्रिस्टेझा, ग्रीनींग : अनुक्रमे मावा व सिल्ला या रोग वाहक किडींचे आंबे बहार, मृग बहार व हस्त बहारातील नवीन
पालवीचे आंतरप्रवाही किटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रीत ठेवावे.
७) उत्पादन : ३०० ते ४०० फळे प्रति झाड प्रति वर्ष.