रामफळ लागवड
आंबा साठवण

आंबा साठवण

जमीन
मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी.

सुधारित व संकरित जाती
केशर, रत्ना, हापूस, सिंधू, पायरी, लंगडा, वनराज, तोतापुरी, साई-सुगंध, सुवर्णा, फुले अभिरुची (लोणच्याच्या कैऱ्यांसाठी).

लागवड अंतर
१०x१० मीटर भारी जमिनीत, ९४९ मीटर मध्यम जमिनीत, लागवडीसाठी कलमांचा वापर करावा. १४१४१ मी. आकाराचे खड्डे घेऊन शेणखत (४०-५०कि.) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्फेट (२ किलो) मिश्रणाने भरावेत. घन लागवड करावयाची झाल्यास ५४५ मी. अंतरावर करावी.

आंतरपीक
बागेत ५ वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

खतांची मात्रा
पावसाळ्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडास दरवर्षी ५० कि. शेणखत + १५०० ग्रॅम नत्र + ५०० ग्रॅम स्फुरद ५०० ग्रॅम पालाश द्यावे. पैकी नत्राचा हप्ता जुलै व सप्टेंबरमध्ये दोन समान हप्त्यात विभागून द्यावा. तर स्फुरद व पालाश जुलैमध्ये एकाच हप्त्यात द्यावे.

पाणी व्यवस्थापन
पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कीड व रोग नियंत्रण
१) बांडगुळे काढावीत. मोहराचे संरक्षणासाठी १.५% क्लोरोपायरीफॉस डस्ट २० किलो या प्रमाणात ४ ते ५ वेळा धुरळणी करावी. वाळलेल्या रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात.
२) आंबा मोहोर-करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिक फुलोऱ्यात असताना कार्बेन्डॅझीम १२%+ मॅन्कोझेब ६३% डब्ल्यू.पी. (२० ग्रॅम/१० ली पाणी) या संयुक्त बुरशीनाशकाच्या दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेण्यात याव्या.

इतर महत्वाचे मुद्दे
१. पश्चिम महाराष्ट्रात केशर आंब्यामध्ये फळांचे अधिक उत्पादन व काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढविण्यासा ऑक्टोबर महिन्यात काळ्या पॉलिथीनचे (१०० मायक्रॉन) आच्छादन करून, काढण्यापूर्वी एक महिना अगोदर ४ कॅल्शिअम नायट्रेटची (४०० ग्रॅम / १० लिटर पाण्यात फवारणी करावी.)
२. पश्चिम महाराष्ट्रात केशर आंब्यामध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फलधारणा आणि उत्पादन वाढविण्यासाठी १ पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची (१०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात) मोहोर फुटण्याच्या वेळी आणि त्यानंतर ए महिन्यानी १% पोटॅशियम नायट्रेटची (१०० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात) फवारणी करावी.
३. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावठी व अनुत्पादक झाडांचे सुधारीत जातींमध्ये रुपांतर करण्यासाठी, आंब्याची झाडे नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून २ मि. उंचीवर छाटून, फांदीवरील नवीन फुटव्यांवर अनुक्रमे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केशर वाणाचे पाचर कलम करावे.
४. पश्चिम महाराष्ट्रात केशर आंब्याच्या झाडांना डिसेंबर महिन्यात लवकर मोहोर येवून मे महिन्यात लवकर काढप करण्यासाठी २३ टक्के पॅक्लोबुट्राझोल हे 'पीक वाढ निरोधक' ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खाली तक्त्यामध्ये गरजेनुसार ०.५० ते १.० ग्रॅम क्रियाशील घटक (२.१७ ते ४.३४ मिली) / मिटर झाडाच्या घेऱ्याचा व्या या प्रमाणात जमिनीतून देण्यात यावे.