जांभूळ उत्पादन

जमीन/ हवामान
पाण्याचा उत्तम निचरा होणारी, खोल मातीची, ओलावा धरून ठेवणारी जमीन योग्य आहे. उष्ण समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.

अभिवृद्धीचा प्रकार
बियांपासून गादी वाफ्यावर रोपे तयार करून तसेच पॅच पद्धतीने डोळे भरून अभिवृद्धी करता येते.

लागवडीचे अंतर
१०४ १० मी. लागवडीसाठी १४ १५ १ मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

शिफारशीत जाती
स्थानिक आणि कोकण बहाडोली.

झाडांची संख्या
१०० प्रति हेक्टरी.

खतांचे व्यवस्थापन
खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + १०० ग्रॅम १०% + १५ ते २० किलो पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व उर्वरीत भाग चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास (५ वर्षानंतर) ५० किलो शेणखत व ५०० : २५० : २५० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यामध्ये विभागून द्यावे.

उत्पादन
पूर्ण वाढलेल्या झाडापासून (८ ते १० वर्षानंतर) ५० ते १०० किलो फळे मिळतात.