नारळ कीटनाशके

जमीन
एक मिटर खोलीपर्यंतची, कसदार, भुसभुशीत व पाण्याचा उत्तम निचरा होणारी.
उष्ण व दमट हवामान, अति कडक थंडी किंवा अति कोरडा उन्हाळा योग्य नाही. समुद्र सपाटीचा
प्रदेश अधिक चांगला.

जाती
बाणवली, प्रताप, टि-डी (केरासकारा) लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलीपीन्स ऑर्डिनेरी, डी टि-२ .
रोपांची निवड: रोपे किमान ९ ते १२ महिने वयाची व ५ ते ६ पानांची असावीत, रोपाचा बुंधा अखूड व जाड
असावा रोपे जोमदार व निरोगी असावीत.

लागवड
दोन ओळीत आणि दोन रोपात ७.५ ते ८ मीटर अंतर असावे. शेताच्या बांधावर ५ ते ७.५ मीटर अंतर ठेवावे. हेक्टरी १२४ ते १७७ झाडे बसतात.
एप्रिल - मे मध्ये १४१४१ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. पाऊस सुरु होण्याच्या आगोदर खड्ड्याच्या तळासी पालापाचोळा घालून १० कि. शेणखत किंवा कंपोस्ट,
चांगली माती व २ कि. एस एस पी व १०० ग्रॅम फोरेट या मिश्रणाने खड्डा भरावा. पाऊस सुरु झालेवर खड्ड्याच्या मध्यभागी रोपाचा नारळ जमिनीच्या
३० ते ४५ सेंमी खाली राहील अशा बेताने रोप लावावे. बाजुची माती घट्ट दाबून घेऊन रोपांना बांबूच्या काठाची
आधार द्यावा. पहिली दोन वर्षे रोपांना सावली करावी.

खतांची मात्रा
पाचव्या वर्षापासून प्रत्येक झाडास ५ घमेली शेणखत, २.२५० कि. युरिया, तीन किलो सिंगल सुपर
फॉस्फेट व २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेणखत व स्फुरद एकाच हप्त्यात जुन महिन्यात
द्यावीत. नत्र व पालाश खते जुन, सप्टेंबर व फेब्रुवारी महिन्यात तीन समान हप्त्यात द्यावीत.

पाणी
पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात ६-७ दिवसानी व उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. पुर्ण वाढ झालेल्या झाडांना ५-१० दिवसातून एक पाणी द्यावे.

ठिबक सिंचन पध्दतीचा सुध्दा वापर
करतात. पुर्ण वाढलेल्या झाडास उन्हाळ्यात ४०-६५ लि. प्रति दोन पाणी द्यावे.

आंतर व मिश्र पिके
नारळाच्या बागेत सुरवातीची ३ वर्षे पपई, केळी, रताळी, भाजीपाला पिके, लिली, निशिगंध, झेंडू
इ. फुलपिके घ्यावीत. आंतर व मिश्र पिकांच्या लागवडीमुळे नारळाच्या उत्पादनात चांगली वाढ
होते.

किडी
१. गेंड्या भुंगा - या किडीचा भुंगा नारळाचा नवीन कोंब खातो शेंड्या जवळ भोके पडलेली
दिसतात व नवीन येणारी पाने त्रिकोणी कापल्या सारखी दिसतात. उपाय : उपद्रव झालेल्या झाडांना तारेच्या हुकाच्या सहाय्याने भुंगे बाहेर काढून नष्ट करून टाकावेत.
२. सोंड्या भुंगा : अळ्या झाडाचा मऊ भाग खातात व खोड आतून पोखरतात. प्रदुर्भाव झाल्याचे बाहेरून ओळखता येत नाही. प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या
बुंध्यावर छिद्रे दिसतात व त्यातुन ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव दिसतो.
३. काळ्या डोक्याची अळी - पानातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पाने करपल्यासारके दिसतात.
४. इरिओफाईड कोळी : सुक्ष्म किड फळाच्या देठाच्या खालल्या भागातुन रस शोषते व तांबुस चट्टे दिसतात व फळांचे आवरण तडकते परिणामी नारळ लहान राहतात व गळ होते.

रोग
१. कोंब कुजणे : १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
२. फळांची गळ : १% बोर्डो मिश्रणाच्या दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.
३. करपा : १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
४. खोडावरील डिंक्या रोग : झाडांना योग्य प्रमाणात खते, पाणी द्यावे. बुंध्यावरील डिंक व
मेलेली साल खरवडून त्या जागी बोर्डो पेस्ट लावावी.

काढणी व उत्पादन
जातीनुसार पाचव्या ते सातव्या वर्षापासून उत्पन्न सुरु होते. फळ धारणा झाल्यापासून ७ ते १२
महिण्यात जरुरी प्रमाणे नारळ सात महिण्यात काढावेत. प्रत्येक झाडापासून ८० ते १०० नारळ मिळतात. नारळाचे आर्थिक आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असते.