जमीन
पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन.
जाती
सरदार (एल-४९).
अभिवृद्धीचा प्रकार
दाब कलम.
लागवडीचे अंतर
६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सुपर फॉस्फेट खत टाकावे. ५% मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ x ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडीसाठी ३४ २ मी. अंतर ठेवावे.
खते
पूर्ण वाढ झालेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश द्यावे पैकी निम्मा नत्र बहाराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.
पीक संरक्षण
१. फळमाशीचे नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा. (फळमाशीचे कामगंध सापळे ४/एकर)
२. फळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३५% डब्ल्यु जी या बुरशीनाशकाची २० ग्रॅ./१० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
३. फळांवरील डागांसाठी मेन्कोझेब (०.२%) ची फवारणी करावी.
४. रोगग्रस्त फळे व फांद्या बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकाव्यात व बागेत हवा खेळती राहील अशी मोकळीकता ठेवावी.
इतर महत्त्वाचे
बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
* पेरुच्या जुन्या बागेत फळांच्या दर्जा व उत्पादनात लक्षणीय घट आढळल्यास, मे महिन्यामध्ये “बागेचे पुनरुज्जीवन” करावे यासाठी अल्प कालावधी करीता (२ वर्षासाठी) “विशेष मध्यम छाटणी' करावी. ज्याद्वारे जुन्या बागेत स्वच्छतेत वाढ होऊन उच्च प्रतिचे किफायतशीर फळ उत्पादन मिळते.
* पेरुच्या बागेतून अल्प कालावधीत (सुरुवातीची ३.५ वर्षे) फायदेशीर उत्पादन घेण्यासाठी, पेरु कलमांची २ ४ १ मी. अंतरावर, “अती-घन लागवड' किंवा ३ x २ मी. अंतरावर, “घन लागवड करावी.
* पेरु घन लागवडीच्या पध्दतीमध्ये (२ x २ मी.) पहिल्या साडेतीन वर्षानंतर, झाडांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झाडाच्या मागील दोन हंगाम वाढीच्या ठिकाणी पुनर्लाटणी करावी.
उत्पादन
७०० ते १५०० फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात.