रामफळ आंतरपिके

रामफळाला मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन लागते. याची अभिवृद्धी डोळे भरून आणि मृदकाष्ठ कलमांद्वारे होते.लागवड 5 मीटर x 5 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 50 सें.मी. x 50 सें.मी. x 50 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. शेणखत, माती आणि 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.
नवीन लागवड केलेल्या झाडास काठीचा आधार द्यावा. आळ्यात आच्छादन करावे. पाण्याचा ताण पडू देऊ नये.