डाळिंब आंतरपिके

इतर महत्त्वाचे मुद्दे
१) रोपांची खरेदी खात्रीशीर शासनमान्य रोपवाटीकेतूनच करावी. मातृवृक्ष बाग तेलकट डाग/मर रोग मुक्त असल्याची तसेच
रोपवाटीका तपासणी तज्ञामार्फत झाली असल्याची खात्री करावी.
२) डाळींबाची लागवड ४.५ x ३.० मीटर (१५.०x१०.०फुट) अंतरावरच करावी त्यापेक्षा कमी अंतरावर डाळींबाची लागवड
प्रकर्षाने टाळावी कारण अशा बागेत तेल्या बरोबरच मर रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढते.
३) रोप लागवडीनंतर साधारणपणे दोन वर्षांनी पहिला बहार धरावा त्यापूर्वी बहार धरल्यास झाडे कमकुवत व अशक्त राहील्याने
रोगास लवकर बळी पडतात.
४) अधिक आर्थिक फायद्यासाठी ४.५ x ३.० मी. अंतरावर लागवड केलेल्या डाळिंबामध्ये ठिबक सिंचनाने झाडाजवळचे२०%
क्षेत्र पाण्याने ओलीताखाली येणे योग्य असते. त्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलीताखाली आल्यास बागेत सूक्ष्म हवामान तयार होऊन
खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे व मर रोग यांचा प्रादुर्भाव वाढतो.
५) खोडकिडीचा जास्त प्रार्दुभाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये डाळिंबाला हलक्या जमिनीत चार खोडे ठेवून वळण देणे योग्य ठरते.
६) डाळिंबामध्ये दर्जेदार फळांचे उत्पादन घेण्यासाठी बहार व्यवस्थापन करतांना पानगळ झाल्यानंतर बाहेरील फांद्याची शेंड्यापासून २०
सें.मी. अंतरावर छाटणीसह मध्यवर्ती भागात भरपूर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी आतील फांद्यांची विरळणी करण्याची शिफारस
 करण्यात येत आहे.
७) वर्षातून एकच बहार धरावा. बहार धरल्यानंतर झाडाच्या आकारमानानुसार नियंत्रित फळे ठेवावीत त्यामुळे फळांचा आकार वाढुन
दर्जेदार फळ उत्पादन शक्य होते.
८) गुणवत्तापूर्वक उत्पादनासाठी सुक्ष्मअन्नद्रव्यांचा तसेच जीवाणू खताचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.
९) नैसर्गिक पानगळ झाली नसल्यास पानगळ करण्यासाठी बहार धरण्यापूर्वी २० दिवस अगोदर इङ्गेल या संजीवकाची २ मिली प्रति
लिटर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
१०) खते झाडाच्या घेऱ्याजवळ कोली करून किंवा ड्रीपरच्या खाली टाकून मातीने झाकावीत.
११) ठिबक सिंचनाने पाणी देणे शक्य नसल्यास पाटाच्या साहाय्याने उन्हाळी हंगामात ८ ते१० दिवसांनी, पावसाळ्यात १३ ते १४
दिवसांनी (पाऊस नसताना) तर हिवाळ्यात १७ ते १८ दिवसांनी पाणी द्यावे.
१२) खोडाला लहान छिद्रे पडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर) यांचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी १ लिटर पाण्यात ४०० ग्रॅम गेरू रात्रभर
भिजवावा.
१३) रोगट फळे, पाने व फांद्या बागेपासून दूरवर जाळून नष्ट करावेत.
१४) बहार धरतेवेळी शेणखत व निंबोळी पेंड सोबत एकत्र मिसळून रिंग पद्धतीने झाडाभोवती द्यावे तसेच डाळिंबाच्या झाडाभोवती
झेंडूची लागवड केल्यास सुत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होतो.

तेलकट डाग रोग
डाळिंबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग ही एक मोठी समस्या आहे.
महाराष्ट्रात या रोगाचा शिरकाव रोगग्रस्त कलमाद्वारे झालेला असून, या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.
त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे.

 रोगास अनुकूल बाबी
* बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे, तसेच तणांची मोठ्या प्रमाणावर वाढ असणे.
* झाडांची गर्दी, खेळत्या हवेचा तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.
* ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
* रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर.
* रोगग्रस्त बागेत वापरलेल्या हत्यारांचा (उदा. कात्री, सिकेटर इ.)छाटणीसाठी वापर करणे.

शेतात रोपांचे एक वर्षांपर्यंत करावयाचे व्यवस्थापन
* रोप कॅल्शियम हायपोक्लोराईड ने (१०० ग्रॅम/खड्डा) निर्जंतुक केलेल्या खड्डयात लावावे.
* रोपांची लागवड कमीत कमी ४.५ मी x ३.० मी. अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावीत.
* स्वच्छता मोहिम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करून नष्ट करावेत. बहार धरतांना
जमिनीवरील रोगट जिवाणुंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचींग पावडर १५० ग्रॅम प्रति ५-६ लिटर पाण्यात मिसळून
(झाडाच्या वयानुसार) झाडाखाली भिजवण करावी किंवा झाडाखाली ४% ताम्रयुक्त भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी. _झाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालून छाटावे.
* छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी १ टक्का डेटॉलच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी.
* छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी (१०%).
डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागांच्या पुर्नजीवनासाठी
व तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी - वेळापत्रक.
१. फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोमोपॉल ५०० पीपीएम फवारावे. (ब्रोमोपॉल ५० ग्रॅम प्रति १०० लि.पाणी).
२. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला ३ महिने विश्रांती द्यावी.
३. बहार घेण्यापूर्वी संपुर्ण पानगळ करून घ्यावी (इथरेल १ ते २ मिली/लिटर) रोगट फांद्याची छाटणी करावी.
४. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
५. पानगळ आणि छाटणीनंतर कॅप्टन ०.५ % फवारावे.
६. नविन पालवी फुटल्यानंतर - कॅप्टन (०.२५%) ची फवारणी करावी. पानावर आणि फळावर रोगाचा प्रार्दुभाव दिसत असेल तर
फवारणी चालू ठेवावी आणि रोग नसेल तर ३० दिवसांचे अंतराने फवारावी.
७. सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या ३० दिवस पूर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या
२० दिवस पूर्वी बंद करावी.

टिपणी
१. इतर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले उपाय अवलंबावेत.
२. उत्पादन वाढीसाठी आणि निरोगी बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे करावे.


 रोपवाटीका तयार करतांना करावयाचे व्यवस्थापन
* गुटी कलमासाठी तेलकट डाग निरोगी भागातील निरोगी मातृवृक्षाची निवड करावी.
* तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावासाठी झाडांचे व रोपांचे परिक्षण करुन घ्यावे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
रोप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माती सुर्यकिरणांनी निर्जंतुक करुन वापरावी. सुर्यकिरणांनी निर्जंतुक करण्यासाठी २-४ महिने लागतात. तसेच पाण्याच्या वाफेने किंवा रासायनिक पदार्थाने निर्जंतुक करता येते.
* कलमे तयार करण्यासाठी लागणाऱ्या माध्यमात जैविक घटकांचा वापर करावा त्यासाठी निंबोळी पेंड ५ किलो, व्हर्मीकल्चर २०० ग्रॅम प्रति १०० किलो मातीत एकत्रितपणे किंवा वेगवेगळे मिसळावे.
* झाडावर गुट्या बांधताना काडीवर शेवाळ (ग्रीन स्पॅग्नम मॉस) पूर्णपणे बांधावे. तसेच काडीच्या कापलेल्या भागावर सुडोमोनास फ्ल्युरोसन्स (१० सी एफ यू / ग्रॅम) आणि आयबीए (१५०० पीपीएम) लावावे.
झाडावरुन कलमे   काढल्यानंतर कापलेल्या भागावार बोर्डोपेस्ट (१०%) लावावी.
* कलमे तयार करण्यासाठी लागणाऱ्या माध्यमात माती आणि चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात वापरावे (५०:५० टक्के) या माध्यमात जैविक घटक मिसळावे व आठ दिवसानंतर कलमे तयार करण्यासाठी वापरावे.
* कलमे तयार करण्यासाठी ४ इंच x ६ इंच आकाराची २५० गेजची काळी पॉलिथीनची पिशवी वापरावी.
* पिशवी भरल्यानंतर चांगल्या वाढीसाठी ५० टक्केच्या शेडनेटमध्ये पिशवी ठेवावी.
* अशा १० पिशव्या एका ओळीत ठेवाव्यात (१ मीटर) व त्याची लांबी गरजेनुसार ठेवावी. रोपवाटीकेत कलमे ठेवल्यानंतर  १५ दिवसांचे अंतराने क्लोर/लोनील (०.२५%)
या बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोपांना गरजेनुसार पाणी द्यावे.    या बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोपांना गरजेनुसार पाणी द्यावे.
* कलमे पिशवीत भरल्यानंतर कमीत कमी ४ महिन्यानंतर लागवडीसाठी वापरावीत.

डाळिंब मर रोग व्यवस्थापन
१. डाळिंब लागवडीसाठी चांगला निचरा होणारी हलकी मध्यम प्रतिची जमीन निवडावी.
२. लागवड करण्यापूर्वी जमीन प्रखर सुर्यप्रकाशात तापवून घ्यावी.
३. रोगविरहीत बागांमधील गुटी पासून तयार केलेलीच रोपे लागवडीसाठी वापरावीत.
४. लागवडीसाठी २ x २ x २ मीटर आकाराचे खड्डे ४.५ मी x ३.० मी. अंतरावर घ्यावेत. याप्रमाणे हेक्टरी ७४० झाडे बसतात. मर रोग जमिनीतून मुळ्यांद्वारेसुद्धा
पसरतो म्हणून कमी अंतरावरील लागवड रोग बळावण्यास मदत होते.
५.खड्डे उन्हाळ्यात लागवडीच्या कमीत कमी १ महिना अगोदर घेऊन उन्हात तापू द्यावेत. यामुळे काही प्रमाणात नैसर्गिक  निर्जंतुकीकरणास मदत होते.
६. खड्यांमध्ये कार्बेनडॅझीम ०.२ टक्के द्रावण ५ लिटर प्रती खड्डा टाकावे. याचबरोबर कार्बारील ५० ग्रॅम प्रती खड्डयाच्या तळाशी व बाजूने खड्डे भरण्यापूर्वी टाकावे.
७. खड्डे निर्जंतूक करणेसाठी कॅल्शीयम हायपोक्लोराईड १०० ग्रॅम प्रती खड्डा वापरावे.
८. भारी जमिनीत खड्डे भरताना त्यामध्ये वाळू आणि माती १:१ या प्रमाणात घेऊन प्रत्येक खड्ड्यात खालील पदार्थ टाकावेत. शेणखत
- २० किलो, गांडूळखत - २ किलो, निंबोळी पेंड - ३ किलो, ट्रायकोडर्मा-प्लस- २५ ग्रॅम, अझोटोबॅक्टर - १५ ग्रॅम, स्फुरद जीवाणू – १५ ग्रॅम
९. पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.
१०. मर रोगाचे काही महत्त्वपूर्ण लक्षण डाळिंबाच्या इतर भागांवरही दिसून येतात म्हणून संपूर्ण झाड काइँडॅझीम द्रावणाने फवारावे.
११. मर रोगाने संपूर्ण वाळलेले, मेलेले आणि कोरडे झालेले झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत.
१२.  अशी रोगट झाडे जाळण्यास नेताना त्यांची रोगट मुळे प्लॅस्टीक पिशवीच्या सहाय्याने झाकून घ्यावीत. कारण बुरशीचे बीजाणू
मोठ्या प्रमाणात मुळांवर/मुळांमध्ये असल्यामुळे चांगल्या झाडांना रोगाची लागण होण्यास मदत होते.
१३. झाडांची छाटणी पावसाळ्यात किंवा उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर करू नये. कारण या कालावधीत किडींचा प्रसार
होतो. किडी या काळात छाटलेल्या भागांमधून निघणाऱ्या वनस्पती पेशीरसाकडे आकर्षिले जातात आणि रोगाच्या प्रसा
रणास कारणीभुत ठरतात.
१४. छाटलेल्या भागांना १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो मोरचूद १ किलो कळीचा चुना १० लि. पाणी) लगेच लावावी.
१५. डाळिंबाच्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी (जो मर रोगासही कारणीभूत ठरतो) १० लि. पाण्यात गेरू - ४ किलो, कॉपर
ऑक्सीक्लोराईड - २५ ग्रॅम या प्रमाणात मिसळून झाडाच्या खोडास जमिनीपासून २ फुटापर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे. गेरू रात्रभर भिजत ठेऊन त्यात दुसऱ्या दिवशी औषधे मिसळावीत.
१६. सुत्रकृमी नियंत्रणासाठी आफ्रिकन झेंडू दोन झाडाच्या व ओळीच्या मधल्या रिकाम्या जागेत किंवा झाडाभोवती गोल
कडेनेलावावे. सुत्रकृमींची संख्या कमी करण्यास मदत होते. चांगल्या निष्कर्षासाठी ४ ते ५ महिने झेंडूची लागवड करावी.
१७. बागेची स्वच्छता आणि निगा चांगल्याप्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने करावी.

सुत्रकृमी नियंत्रणाकरीता प्रतिबंधक उपाय
* डाळिंबाचा बहार धरतांना जमिनीत हेक्टरी १.५ ते २ टन निंबोळी पेंड खोडाभोवती मुळांजवळ मातीत मिसळावी.
* बागेमध्ये पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मायुक्त परोपजीवी बुरशीजन्य पावडर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक
झाडाच्या बुंध्यापाशी जमिनीत ओतावे. तसेच हिरवळीचे खत म्हणून ताग, धैंचा इत्यादीचा वापर करावा.
*जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या बागेत खोडाच्या भोवताली आफ्रिकन झेंडूची लागवड करावी. बऱ्याच डाळिंब बागांमध्ये सद्यःस्थितीत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव
मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले. मर रोग वाढण्यास सूत्रकृमी हा एक प्रमुख घटक असल्याने या सुत्रकृमीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण या सूत्रकृमींच्या प्रादुर्भावाने
फ्युजरियम बुरशीचा शिरकाव झाडांमध्ये मुळांद्वारे इजा झाल्याने सहजपणे होते आणि पर्यायाने मर रोगाचा प्रादुर्भाव होवून झाडे मरण्यास सुरुवात होते. येथे सुचविल्याप्रमाणे सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरीता प्रतिबंधक उपाय योजना करणे गरजेचे आहे.
वरीलप्रमाणे या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.