काजू सुधारित जाती

प्रस्तावना
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

हवामान
काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. स्वच्छ व भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक.

जमीन
समुद्रकाठची जांभ्या दगडापासून तायर झालेली उत्तम निच-याची जमीन, आम्लधर्मीय जमीन.

सुधारीत जाती
वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ वेंगुर्ला,९.

खते
कलमांची लागवड करताना प्रत्येक खड्यात १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २ ते ३ घमेली शेणखत घालावे. लागवडीनंतर एक वर्षाने झाडांना ऑगस्ट महिन्यात खालीलप्रमाणे खतांची मात्रा द्यावी.

लागवड अंतर
७ X ७ मी, ८ X ८ मी याप्रमाणे हेक्टी २०० ते १५५ झाडे बसतात घन लागवड ४ X ४ मी किंवा ५ X ५ मी.

अभिवृध्दी
मृद काष्ट कलम, Air Layining, epicotyl grafting.

आंतरपिके
काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेता येतात. आंतरपिके म्हणून वेलवर्गीय भाजीपाला उदा. काकडी, दोडकी, कारली तसेच भोपळा, या पिकांची लागवड आर्थिकदृष्टया फायदेशीर आढळून आली आहे.

काजू पिकाची छाटणी
मे महिन्यात झाडांची छाटणी फायदेशीर ठरते. झाडावरील सुकलेल्या, वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात व कापलेल्या फांदीच्या टोकावर बोर्डोपेस्ट लावावी.
स्थानिक कमी उत्पादन देणा-या झाडाचे पुनरुज्जीवन
कमी उत्पादन देणारे ३-१५ वर्ष वयाची झाडे जानेवारी – मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये जमिनीपासून १ मीटर उंचीवर करवतीने कापावीत. झाड तोडल्यानंतर १५-२० दिवसांनी झाडाच्या खोडावर फुटवे येण्यास सुरुवात होते. खोडाच्या अगदी वरच्या भागावर येणारे ३-४ फुटवे येण्यास सुरुवात होते. खोडाच्या अगदी वरच्या भागावर येणारे ३-४ फुटवे १० ते १५ सें.मी. लांबीचे झाल्यावर त्यावर मृदकाष्ठ कलम पद्धतीने कलमे बांधावीत.

काढणी व साठवण
मोहोर आल्यानंतर काजू बिया पक्व होण्यास सुमारे ६० दिवसांचा कालावधी लागतो. काजू बोंड पूर्ण पक्व झाल्यावर काढून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ दिवस प्रखर उन्हात वाळवावे.