सिताफळ लागवडीसाठी जमीन कशी असावी

जमीन
हलकी ते मध्यम.

जाती
बाळानगर, अर्का सहान (संकरित), फुले पुरंदर, फुले जानकी.

लागवडीचे अंतर
५.० x ५.० मीटर.

खते
पूर्ण वाढलेल्या झाडास ३० ते ४० किलो शेणखत, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे. शेणखताबरोबर ॲझोस्पीरीलम व पी.एस.बी. या जीवाणू खतांचा वापर करावा.

आंतरपिके
पिकाच्या लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, मूग चवळी, सोयाबीन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.

उत्पादन
२५ ते ३० किलो / झाड (५ वर्षांवरील झाड).

इतर महत्वाचे मुद्दे
१) झाडाच्या एकसारख्या वाढीसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात पानगळ झाल्यानंतर हलकी छाटणी करावी.
२) पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.
३) सिताफळाची फळे लवकर मिळण्याच्या दृष्टीने (बिगर हंगामी) व अधिक बाजारभाव मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडाभोवती बाजरीची पेरणी करावी.